

कोल्हापूर - कोल्हापूर, सांगली, अकलूज येथून इराक सहलीवर गेलेले ४४ पर्यटक कोरोना व्हायरसच्या कारणाने इराणमधील तेहरानमध्ये अडकले आहेत. शुक्रवारी (ता.२८) सकाळी सहा वाजता सर्व पर्यटक तेहरान येथून निघून मुंबईत दुपारी साडेबाराला पोहोचणार होते; मात्र भारताने इराण येथून येणाऱ्या विमानांना परवानगी नाकारल्याने सर्व प्रवासी अडकून पडले आहेत. यात कोल्हापूरचे २१ तर उर्वरित प्रवासी सांगली आणि अकलूज येथील असल्याचे समजते.
मायदेशी आणण्याचे आवाहन
मुंबई येथील साद टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने इराक सहलीचे आयोजन केले होते. मुंबई येथून २१ तारखेला पर्यटक मुंबई ते तेहरान आणि तेहरान ते नजम (इराक) या विमानाने गेले होते; मात्र इराकने प्रवेशबंदी केल्याने हे सर्व पर्यटक तेहरान येथे अडकून पडले. आठ दिवस ते याच ठिकाणी फिरत राहिले.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता भारतात येणारे विमान आल्याने या पर्यटकांनी रात्री बारा वाजता हॉटेल सोडले; मात्र विमानतळावरून सहा वाजताचे विमान भारताकडे निघालेच नाही. भारताने कोरोना व्हायरसच्या धोक्याचे कारण देत या विमानाला परवानगी नाकारली. त्यामुळे सर्व पर्यटक तेथेच अडकून पडले आहेत.
कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या चिंतेत
ज्या हॉटेलमध्ये ते राहिले होते, त्यांनी पुन्हा या पर्यटकांना राहण्यास नकार दिला. त्यामुळे या पर्यटकांना तेहरानच्या आजूबाजूला फिरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.येत्या मंगळवारी (ता. ३) पुन्हा भारताचे विमान रवाना होईल, असे पर्यटकांना सांगण्यात आले आहे. मात्र त्यावेळी काही अडथळा येऊ नये म्हणून प्रवासी आणि त्यांचे भारतातील कुटुंबीय विविध माध्यमातून केंद्र सरकारची संपर्क साधत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व पर्यटक ज्येष्ठ नागरिक आहेत. तेहरीनमध्ये थांबलेल्या पर्यटकांना आरोग्याचा कोणताही त्रास नसल्याचे टूर आयोजकाने सांगितले. हे सर्व पर्यटक आज मायदेशी परतणार असल्याने त्यांचे कुटुंबीय आनंदात होते; मात्र अचानकपणे त्यांचे विमान रद्द झाल्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या चिंतेत आहे.
अडकलेले पर्यटक -
कोल्हापूर, सांगली आणि अकलुजमधील अडकलेले पर्यटक असे - यासिन अली नदाफ, ईस्माईल गुलाब मुजावर, महंमदरफिक इलाई मुल्ला, महंमद रहमान काजी, मुस्तफा वहाबुद्दीन सय्यद, जिब्राईल रसुल नदाफ, कय्युम अब्बास मुलाणी, जिलानी युसुफ शेख, शब्बीर गफूर शेख, अब्दुलगणी लतिफ शेख, शरीफउद्दीन शमशुद्दीन मोमीन, जैनुतबी शरीफउद्दीन मोमीन, ताहीरुनिस्सा मोमीन, शमशुन्निस्सा नसिररुद्दीन मोमीन, नसिररुद्दीन चाँदसाहेब मोमीन, अमीराखातून अब्दूलसंमद पिरजादे, अब्दुलसंमद मोहम्मदाझिम पिरजादे, नगिना नबीलाल पटवेगार, नबीलाल मोहंम्मद पटवेगार, रशिद गणी मुजावर, नजमोद्दीन चाँदसाहेब मोमीन, कौसर नजमोद्दीन मोमीन, हुसेनबी नदीमुल्ला पिरजादे, गलिबून्नीसा फैजअहमंद पिरजादे, इरफान इस्लाईल बागवान, जाकीरहुसेन मौला मुल्ला, नूरमहंमद अमीर मोकाशी, रोशन मकबुल मुल्ला, मकबुल हुसेन मुल्ला, दस्तगीर ताजुद्दीन शेख, सफीनुन्निसा सिराजुद्दीन मोमीन, सिराजुद्दीन जमाल मोमीन.
सरकारने मदत करावी...
कोल्हापूरमधील टूर आयोजक मुन्ना सय्यद तेहरानमधून ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की आम्ही तेहरान येथे अडकलो आहोत. सध्या सर्वच पर्यटकांची तब्येत उत्तम आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. सर्व काही शांततेत सुरू आहे. आमची आजची फ्लाईट अचानकच रद्द झाल्याने आम्हाला येथे थांबावे लागत आहे; मात्र लवकरात लवकर येथून आम्हाला मायदेशी नेण्यासाठी केंद्र सरकारने व विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रयत्न करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.